मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मागील अनेक वर्षांपासून असणारी मागणी काल पूर्ण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत राज्यात होत असताना मनसेच्या वतीने नवी मुंबईतील वाशी मध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी बोलताना मनसे मागील 12 वर्षापासून यासाठी पाठपुरावा करत असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी काही मागण्या केल्या होत्या त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही प्रमुख मागणी होती आणि आज ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली. पक्ष स्थापनेपासूनची मागणी होती ते स्वप्न साकार झाले असून, राज्यात विविध भाषा बोलल्या जातात त्यांचे संवर्धन आणि त्यांच्या वाढीसाठी लागणारा निधी यापुढे मिळणार आहे. जर त्याची कमतरता भासली तर राज ठाकरे प्रयत्न करतील, जगातील सर्वच मराठी जणांची मागणी असलेली आज पूर्ण झाली असेही गजानन काळे म्हणाले आहेत.