Manusmriti : मनुस्मृती दहनातून महिलांचा उध्दार, आनंदराज आंबेडकरांचे उदगार

Update: 2021-12-25 12:48 GMT

रायगड : हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या भिंती तोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याला स्पर्श करून गुलामगिरी नष्ट केली. त्याची साक्ष आणि आठवण आपल्या कृतीतून दाखवा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे, ते महाडमध्ये बोलत होते. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद आणि वर्णव्यवस्था कायम ठेवणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे महाड येथे दहन केले होते. त्या मनुस्मृतीदहन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर महाडला आले होते.

"स्रियांना हीन आणि गुलामगिरीची वागणूक देणाऱ्या आणि त्यांचे नैसर्गिक स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या मनुस्मृतीचे बाबासाहेबांनी दहन केले होते, पुढे महिलांना समान हक्क व अधिकार देणारे हिंदु कोड बील व संविधान देशाला बहाल केले, कालपर्यंत मनुवादी व्यवस्थेने नाकारलेल्या स्त्रियांना आज स्वतंत्रपणे व्यक्त होण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन समस्त स्त्रियांच्या उध्दाराचा मार्ग मोकळा केला," असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. मनुस्मृती दहन करतेवेळी महाडकरांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्याची आठवण ठेऊन महाडकरांनी आदर्श निर्माण करावा असे अवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.


Tags:    

Similar News