राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षेबाबत गोंधळ समोर आला आहे.१६ फेब्रुवारी २०२२ म्हणजेच आज सकाळी एक अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सरकारी बंगल्यात घुसण्यच्या प्रयत्न केला आहे.
अजित डोवाल यांच्या सराकारी बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने कार सहित घुसल्याच्या प्रयत्न केला आहे.या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती आपल्या शरिरामध्ये चीप असल्याचं सांगत आहे.मला कंट्रोल केलं जात असल्याच्या दावा या व्यक्तीकडुन केला जात होता. मात्र तपासामध्ये या वक्तीच्या शरिरामध्ये कोणतीही चीप आढळून आली नाही.अटक करण्यात आलेली व्यक्ती ही कर्नाटकमधील बंगळुरुची आहे.दिल्ली पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाबरोबरच विशेष पथकाकडुन आता या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.
भारताचे जेम्स बॉण्ड नावाने अजित डोवाल यांना ओळखलं जातं. ते पाकिस्तान आणि चीनविरोधात भारताचे सुरक्षा धोरण ठरवणाऱ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पाहणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.