"...अन्यथा 'कोल्हापुरी' हातात घेऊन कोकणवासीय नवाब भाईंचं स्वागत करतील"

कोकण दौरा म्हणजे, 'विरोधकांचा सुट बुट दौरा' अशी टीका नवाब मलिक यांनी केली होती;

Update: 2021-05-22 07:18 GMT

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सर्वाधिक नुकसान कोकणचे झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे सुद्धा सुरू झाली आहेत. मात्र नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केली आहेत.त्याचाच भाग म्हणजे भाजप नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांचा कोकण दौरा करत नुकसानीची पाहणी केली होती. तर फडणवीस यांचा हा दौरा म्हणजेचं 'विरोधकांचा सुट-बुट दौरा' अशी टीका नवाब मलिक यांनी केली होती.




 मलिक यांनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे."विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा!, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहिलं, कोकणवासीय 'कोल्हापुरी चप्पल' हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील" असा टोला दरेकरांनी लगावला आहे.

 


Tags:    

Similar News