दोन महात्मा आणि आंबेडकर: रावसाहेब कसबे…

Update: 2021-04-14 17:10 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचारवंत रावसाहेब कसबे यांनी 'फुले ते आंबेडकर' या व्याख्यानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील राजकीय आणि सामाजिक निर्णयावर भाष्य केलं.

यावेळी त्यांनी बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांचे संबंध कसे होते? यावर बोलताना…

महात्मा गांधींना असपृश्यांचं वावडं होतं का? आंबेडकर आणि महात्मा गांधींचे कोणत्या विषयावर पटत नसायचे? दलितांना राजकीय आरक्षण देण्यासाठी आंबेडकरांनी काय केले? अनेक महात्मा आले आणि गेले असं आंबेडकरांनी गांधींना का म्हटले? गांधीं आणि आंबेडकरांचा संघर्ष काय होता?

प्रखंड मत व्यक्त केलं.


तसंच सामाजिक विषयावर बोलताना कसबे यांनी बाबासाहेबांचे सामाजिक योगदान आणि समाजजीवन याविषयी बोलताना… पुढील प्रश्नांची उत्तर दिली…


 समाजातील जाती नष्ट करण्यासाठी आंबेडकरांनी कोणत्या उपाययोजना सांगितल्या? भारताचं भवितव्य घडवणारं डॉ. आंबेडकरांच भाषण कोणतं आणि त्यातून काय सांगण्यात आलं होते? भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला राजकीय समता दिली आहे. परंतू सामाजिक आणि आर्थिक समानता, स्वातंत्र्य दिलं नाही असं आंबेडकर का म्हणाले? 

यावर भाष्य केलं.


कसबे महात्मा फुलेंविषयी बोलताना सांगतात…

महात्मा जोतिराव फुले यांची दूरदृष्टी समजून घेण्यासाठी बराच काळ लागला. बाबासाहेब आंबेडकरांनी फुले यांना गुरू मानल्यामुळे महात्मा फुलेंना जी समाजात क्रांती घडवायची होती. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे शक्य झाली.

जर आपल्याला महात्मा जोतीराव फुले नीट समाजावून घ्यायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नीट समजू घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेबांना समजून घेतल्याशिवाय जसे महात्मा फुले समजावून घेता येत नाही. तसेच महात्मा गांधी ही समजावून घेता येत नाही. असं मत कसबे यांनी व्यक्त केलं.

बाबासाहेबांचं राजकारण…

1924 पासून बाबासाहेब आंबेडकर भारतीय राजकारणात आले. माणसाच्या उद्धारासाठी, समतेसाठी जगाच्या पातळीवर कोणकोणती प्रयत्न होत आहे. ते त्यांनी पाहिलेले होते. भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी संघटना स्थापन केली.

बहिकृष्त हितकारणी सभा

बहिकृष्त हितकारणी सभा ही बाबासाहेबांनी स्थापना केलेली पहिली संघटना. यामागच्या त्यांचा हेतू असं होता की, या देशातील लोक जे या समाजाबाहेर आहे. ज्यांना असपृश्य समजलं जातं. अशा लोकांना मुख्यप्रवाहात आणायचं असेल तर या देशातल्या जातीसंस्थेच्या विरुद्ध कठोर उपाय करावे लागतील.

या देशातील जातीसंस्था नष्ट करायच्या असेल तर त्यासाठी ज्या धर्मांनी या जातींना मान्यता दिली. त्या धर्माची चिकित्सा करावी लागेल, असं बाबासाहेब आंबेडकर मानत होते. म्हणून त्यांनी सुरुवात करताना दलित आणि समविचारी दलितोत्तर अशा लोकांना एकत्र आणलं. आणि बहिष्कृत हितकारणी स्थापना करण्यात आली.

Tags:    

Similar News