Arun Gandhi passes Away : गांधी परिवारावर शोककळा, तुषार गांधी यांचे वडील अरुण गांधी यांचे निधन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे 89 व्या वर्षी निधन झाले.;

Update: 2023-05-02 06:05 GMT

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे वडील अरुण गांधी यांचे मंगळवारी पहाटे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. ते महात्मा गांधी यांचे दुसरे अपत्य मनिलाल गांधी यांचे पूत्र होते.

अरुण गांधी हे भारतीय अमेरिकन लेखक होते. त्यांनी सामाजिक व राजकीय विषयावर लेखन केले. त्यांनी आजोबा महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचा वसा घेतला होता.

अरुण गांधी यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दर्बन या ठिकाणी झाला. त्यानंतर अरुण गांधी 1946 मध्ये महात्मा गांधी यांच्यासोबत सेवाग्राममध्ये राहत होते. त्यानंतर अरुण गांधी यांनी महात्मा गांधी यांना कधीही पाहिले नाही.

अरुण गांधी यांनी 2003 मध्ये मानवतेचा जाहीरनामा प्रसिध्द केला. आज अरुण गांधी यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.

 

Tags:    

Similar News