#MaharashtraBandh :मोदींची चमचेगिरी बंद करा निखिल वागळेंनी खासदाराला खडसावले

Update: 2021-10-11 03:15 GMT

लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri ) शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची घोषणा कऱण्यात आली आहे. भाजपविरोधात हा बंद आहे. पण या बंदला नागरिक प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे.


उन्मेष पाटील यांनी रविवारी एक ट्विट करत म्हटले होते की, "उद्याच्या महाराष्ट्र बंदला राज्यातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध! सर्व दुकाने सुरूच राहणार, माझा महाराष्ट्र सुरूच राहिल." असा दावा केला होता.



त्यांच्या दाव्याला निखिल वागळे यांनी उत्तर देत " व्यापारी स्वार्थी आहेत. भाजपचे गुलाम आहेत. त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. शेतकरी नसतील तर तुम्ही कसे जेवू शकाल? मोदी घालतील का जेवायला? असा सवाल विचारला होता.  

त्यावर उन्मेष पाटील यांनी उत्तर देत "पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेबांच्या नेतृत्व मध्ये देश आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्यापारी सुज्ञ आहेत महाराष्ट्र बंद होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महापूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यां शेतकरी बांधवांना आज पावेतो कोणतीही मदत देण्यात आलेले नाही ? " असे ट्विट केले होते.



या ट्विटला निखिल वागळे यांनी उत्तर देत उन्मेष पाटील यांना फटकारले आहे. "मोदींची चमचेगिरी बंद करा. हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे!" या शब्दात फटकारले आहे.

भाजपने व्यापारी बंदला पाठिंबा देणार नाहीत असा दावा केला असला तरी मुंबई, नवी मुंबई एपीएमसी आणि पुण्यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला आहे.

Tags:    

Similar News