कोरोना-लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला जबर फटका: तिजोरीत 1 लाख 56 हजारांची तूट

जागतिक महामारी कोरोना नियंत्रणासाठी लावलेल्या लॉक डाऊनचा जबरदस्त फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला असून अपेक्षित परंतु अनपेक्षित अशा विक्रमी तब्बल 1 लाख 56 हजार कोटींची तुटीची झळ राज्याच्या तिजोरीला बसली असून शेती वगळता सर्वच क्षेत्रांत उणे विकासदर नोंदला गेला आहे.आज विधिमंडळात सादर केलेला आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची बिकट अर्थस्थिती स्पष्ट झाली आहे.

Update: 2021-03-05 08:15 GMT

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी (८ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी आज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. राज्याच्या उत्पन्नात 1 लाख 56 हजारांची तूट झाली आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये 2020-21 च्या पूर्वअनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित दाखवण्यात आली आहे. तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योगात उणे 11.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे 9 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे.

पहिल्या सुधारित अंदाजानुसार, 2019-20 चे सांकेतिक स्थूल उत्पन्न 28,18,555 कोटी इतके होते तर 2018 -19 मध्ये हे उत्पन्न 25,19,628 कोटी होते. 2019-20 मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न 21,34,065 कोटी होते तर 2018-19 मध्ये 20,33,314 कोटी होते.

सन 2019-20 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,02,130 कोटी होते तर 2018-19 मध्ये 1,87,018 कोटी होते.वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 च्या सांकेतिक स्थळ राज्य उत्पन्नात 1,56,925 कोटी घट अपेक्षित आहे. 2020-21 चे दरडोई राज्य सरकारचे उत्पन्न 1,88,784 अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे.

अर्थसंकल्पीय पाहणी अहवालाच्या अंदाजानुसार, 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या दरम्यान प्रत्यक्ष महसुली जमा 1,76,450 कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 50.8% आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार, राज्याचा महसुली खर्च 3 ,56,968 कोटी असून 2019- 20 सुधारित अंदाजानुसार 3,41,224 कोटी आहे. मोठ्या , मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे 20 जून 2019 अखेर 53.04 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आणि 2019-20 प्रत्यक्ष सिचन क्षेत्र 40.52 लाख हेक्टर होते.

Tags:    

Similar News