Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 7 सदस्यांच्या खंडपीठाकडे?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच सत्तासंघर्षाची सुनावणी 7 सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.;

Update: 2023-02-15 05:39 GMT

Maharashtra political Crisis : सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. त्यातच आता हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडून सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने कपील सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केली आहे.

शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानतंर सुरु झालेल्या सत्तासंघर्षावर सात महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. सध्या या प्रकरणावर पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी घेत आहे. मात्र हे प्रकरण अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया (Nabam Rebia) प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात येत आहे. मात्र नबाम रेबिया हे प्रकरण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला लागू होत नसल्याचे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी व्यक्त केले.

 ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी (Abhishek manu Singhavi) आणि देवदत्त कामत (Devdatta Kamat) यांनी बाजू मांडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे (Harish Salve), नीरज कौल (Neeraj Kaul) आणि मनिंदर सिंग (Manindar Singh) हे बाजू मांडणार आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यिय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नबाम रेबिया प्रकरणाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठाने केली होती. मात्र या प्रकरणाला चॅलेंज करण्यासाठी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Tags:    

Similar News