Air India च्या इमारतीत मंत्रालय सुरु होणार?

Update: 2022-10-19 01:58 GMT

राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमान वाहतूक मंत्र्यांना Air India ची इमारत विकत देण्याची मागणी केली. 

राज्य सरकार Air India ची बिल्डिंग विकत घेणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी विमान व वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Air India ची इमारत महाराष्ट्र सरकारला देण्याची विनंती केली. यावेळी विमान व वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

राज्याच्या मंत्रालयातील जागा प्रशासकीय कामांसाठी कमी पडत आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कामांसाठी एअर इंडियाची इमारत विकत घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यानिमीत्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर इंडियाची इमारत विकत घेऊन प्रशासकीय कामांसाठी वापरण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे सांगितले. त्यामुळे एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला कधी मिळणार? आणि एअर इंडियाच्या इमारतीत प्रशासकीय काम कधी सुरु होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 



Tags:    

Similar News