बुलढाणा जिल्ह्यात लंपीमुळे ५२९८ जनावरांचा मृत्यू...

लंपी या आजारामुळे फक्त बुलढाणा जिल्ह्यात जनावरांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत ५२९८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.;

Update: 2023-02-22 11:14 GMT

बुलढाणा जिल्ह्यात जनावरांवरील लंपी आजार सध्या आटोक्यात आला असला तरी आजपर्यंत ५३ हजार ७२३ जनावरे लंपी चर्मरोग आजाराने बाधित झाली असल्याची आकडेवारी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलीआहे, यापैकी ४८ हजार ४१९ जनावरे बरी झाली असून ५२९८ जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे ५१५१ शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांपैकी ४१७८ पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी २६ लाख ५३ हजार ७०० रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे,

जिल्ह्यातील उर्वरित पशुपालकांसाठी २ कोटी ७ लाख ५४ हजार ६९६ रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, निधी प्राप्त होताच या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. मात्र लंपी या आजारामुळे जनावरे दगावत असल्यामुळे शेतकरी राजा चिंतातूर झाला आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र सरकार म्हणून जी जी मदत शेतकऱ्यांना करता येईल, ती ती मदत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News