सचिन वाझेच्या ताब्यासाठी ATS कोर्टात जाणार

महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण करणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळलेल्या स्फोटकांनी स्कॉर्पिओ प्रकरणी NIA च्या अटकेत असलेले सचिन वाझेची २५ मार्चला कोठडी संपणार असून आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील त्यांचं नाव आलं असून तो आता मुख्य आरोपी आहे. मनसुख हिरेन हत्येचा तपासात ATS ला सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे सापडल्याचा दावा ATS ने केला असून २५ मार्चला न्यायालयात सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी दावा करणार आहोत असे एटीएस प्रमुख जयदीप सिंग यांनी पत्रकार सांगितले.;

Update: 2021-03-23 12:16 GMT

मनसुख हिरेन हत्या गुन्हयातला घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. तपासी अधिका-यांना तपासामध्ये मृतदेहाच्या अंगावर संशयीत आरोपींकडे घेवून जाणारे कोणतेही पुरावे मिळालेले नव्हते. गुन्हा नोंद केल्याच्या दुस-याच दिवशी दिनांक ०८/०३/२०२१ रोजी फिर्यादी मधील संशयीत आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांनी चौकशी मध्ये त्याचेविरूध्दचे सर्व आरोप फेटाळून लावले. नमूद स्कॉर्पिओ गाडी ही आपल्या ताब्यात कधीही नसल्याचे सांगितळे आणि मृत व्यक्‍ती सोबत कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच सदर खुनाच्या गुन्हयामध्ये त्याचा कोणताही सहभाग नसलेबाबत आणि त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. परंतु दहशतवाद विरोधी पथकाच्या तपास अधिका-यांनी सचिन वाझेचा जबाब खोटा असल्याचे पुरावे प्राप्त केले असून त्यांचा गुन्हयामध्ये नक्की काय सहभाग आहे? याबाबत चौकशी चालू आहे. असे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

अशा परिस्थितीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने प्राथमिक चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयात वापरण्यात आलेल्या सिमकार्डचा शोध लावला. सदरचे सिमकार्ड हे मुंबई मध्ये पत्याच्या क्लब व बेटिंग घेणा-या इसमाने सचिन वाझे याच्या सांगण्यावरून सदरची सिमकार्ड त्याचकडे बुकी म्हणून काम करणा-या नोकराने गुजरात येथील त्याच्या ओळखीच्या इसमांकडून प्राप्त केली.

मनसुख हिरेन यांचा ATS तपास करत असताना अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. मनसुख यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. या अनुषंगाने वाझे यांचा तपास सुरू होता. सचिन वाझे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असले तरी ATS ने अनेक पुरावे हाती घेतले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अनेक जणांची नावं पूढे येत आहेत. अनेक ठिकाणचे CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींनी काही पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केला असे पुरावे आम्ही ताब्यात घेतले आहेत, असं ATS प्रमुखांनी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News