कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनचे शीआन शहर लॉकडाऊन

चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चीनने गुरुवारी पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केली आहे

Update: 2021-12-24 04:46 GMT

चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चीनने गुरुवारी पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केली आहे. दोन वर्षांपूर्वी वुहानमध्ये कोरोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचं चीनने म्हटले आहे. चीनमधील शीआन शहरातील नागरिकांन घरातच राहण्याचे आदेश दिले गेलेत.सोबतच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. या शहराची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख लोक आहे. अगदीच गरज असेल तरच शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र , त्यासाठीही सरकारकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यात 127 रुग्ण आढळून आलेत. दरम्यान नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या असल्याने होणारा प्रवास आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चीनसमोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. .

Tags:    

Similar News