नागपुरात जप्त केलेला 60 लाखांहून अधिक किंमतीचा दारु साठा पोलिसांनी केला नष्ट
नागपुरात पोलीस स्थापना सप्ताह निमित्त विविध कारवाईत जप्त करण्यात आलेल्या देशी-विदेशी दारूच्या साठ्याचा नायनाट करण्यात आला आहे. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशनच्या बाजूच्या आवारात रोड रोलर फिरवून जेसीबीने खड्डा खोदून जवळपास 60 लाख रुपयांचा दारू साठा पोलिसांनी नष्ट केला आहे. पारडी, कपिलनगर, यशोधरा नगर, जरीपटका, जुनी कामठी, नवीन कामठी, कोराडी अशा एकूण आठ पोलीस स्टेशनने जप्त केलेला दारु साठा यामध्ये आहे. 20824 बॉटल्स नष्ट करण्यात आल्या आहेत. यातील काचेचा पुनर्वापर केला जाणार असुन ते जमीनीत गाढण्यात येणार नाही ज्यामुळे याचा पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही. या माध्यमातून तरूण पिढीला व्यसनापासून दुर राहण्याचा संदेश नागपूर पोलिसांकडून दिला जात आहे.