शिविगाळ प्रकरणी विधान परिषद कामकाज पुन्हा एक तासा साठी तहकूब...

अंबादास दानवे यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ, विधान परिषदेचे कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले.

Update: 2024-07-02 06:44 GMT

मुंबई (विधान परिषद)-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिविगाळी प्रकरणा नंतर. सत्ताधाऱ्यांकडून दानवे यांच्या राजीनाम्यावर विधान परिषदेत आज गोंधळ सुरू झाला. दानवे यांचा राजीनामा घ्यावा या साठी विधान परिषदेचे काम काज सुरुहोताच सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. या वर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच गोंधळ सुरू झाल्याने कामकाज आज पुन्हा एक तास साठी तहकूब करण्यात आले आहे.

काल विधान परिषद सभागृहात अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात राहुल गांधींच्या संसदेतील विधानावरून खडाजंगी पाहायला मिळाली. आरोप प्रत्यारोपाचे रूपांतरण वादविवादात झाले. या नंतर याचे रूपांतर शिविगाळीत झाले. व नंतर विधान परिषदेचे कामकाज आज सकाळी कामकाजा पर्यंत स्थगित करण्यात आले होते.

दिवसाच्या कामकाजाच्या सुरवातीलाच पुन्हा गोंधळ सुरू झाल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले. जो पर्यंत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वर कारवाही होत नाही तो पर्यंत कामकाज होऊ देणार नाही. असा पवित्रा सत्ताधारी पक्षाने घेतला आहे.

Tags:    

Similar News