संजय राऊत यांच्या मित्राचा जंबो कोविड घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

राज्यात भाजप विरूध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मित्राने जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.;

Update: 2022-02-05 06:23 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना चांगलाच रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून दररोज भ्रष्टाचाराचे नवे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केले जात आहेत. त्यातच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटी रुपयांचा जंबो कोविड सेंटर घोटाळा. तर संजय राऊत यांचे भागिदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी काढून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर दहिसर वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटर्सचे कंत्राट यांच्याबाबतही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA मार्फत चौकशी करण्याची विनंती करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

या ट्वीटमध्ये पुढे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की, खोटे डॉक्युमेंट देऊन लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीची स्थापना करण्यात आली. तर या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर शनिवारी दुपारी किरीट सोमय्या शिवाजीनगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्याबाबत संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. तर सुजीत पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Tags:    

Similar News