संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रीया

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले.

Update: 2022-02-15 14:11 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये भाजपच्या साडेतीन लोकांची नावं उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. तर शिवसेना भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावर किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची मोठी उत्सुकता लागलेली होती. तर या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन लोकांची नावे जाहीर करण्यात येणार होते. मात्र संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन लोकांची नावं सागण्यास टाळले. तर ते साडेतीन लोक कोण हे जेलमध्ये गेल्यानंतर मोजत बसा, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या, त्यांची पत्नी मेधा सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या यांची पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनरशीप असल्याचा आरोप केला होता. तर किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात जाऊन राज्याचे वाटोळे करत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले.

किरीट सोमय्या म्हणाले की, मी संजय राऊत यांची स्थिती समजू शकतो. तसेच आणखी एका गुन्ह्याचे आणि तपासाचे मी स्वागत करतो. कारण आम्ही काहीही चुकीचे केले नाही. तसेच कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलो नाहीत. त्यामुळे आम्ही न घाबरता भ्रष्टाचाराविरोधातील लढा असाच सुरू ठेऊ.

पुढे सोमय्या म्हणाले की, ठाकरे आणि राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाहीत? तसेच सुजीत पाटकर आणि प्रविण राऊत यांच्याशी असलेले संबंध यावर का बोलत नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी केले.

2017 साली सामना वृत्तपत्रामध्ये बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. तर आता पुत्र नील सोमय्या यांचे नाव घेतले आहे. तर ठाकरे सरकारने माझ्याविरोधात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 3 खटले दाखल करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले.

Tags:    

Similar News