भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोरलई जमीन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्यात सोमय्यांनी बुधवारी सकाळी तक्रार अर्ज दाखल केला. ४०२ पानांचा हा तक्रार अर्ज आहे. यामध्ये सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सत्तेचा गैरवापर, फसवणूक, वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण आणि अनधिकृत घर बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. या तक्रार अर्जावर सात दिवसात कारवाई करुन FIR दाखल न केल्या, ठाकरे परिवाराविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.