'थोड्याच दिवसात ते भारताचं नाव बदलून USA ठेवतील'; विजेंदर सिंह ची टीका

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलल्या नंतर बॉक्सर विजेंदर सिंह ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.;

Update: 2021-08-08 11:12 GMT

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात महत्वाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येतांना दिसत आहे. राजकिय प्रतिक्रियेसोबतच आता खेळ जगतातून देखील याबाबत प्रतिक्रिया येतांना दिसत आहे. बॉक्सर विजेंदर सिंह ने देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "भाई ये नाम ही बदल सकते है थोडे से दिन में india का भी नाम बदल कर usa कर देंगे असं ट्वीट विजेंदर ने केले आहे.

विजेंदर सिंह च्या या ट्विटनंतर चर्चेला उधान आलं आहे. विजेंदर हा नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनाबाबत व्यक्त होत असतो. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत देखील त्याने भुमिका घेत पुरस्कार मागे करण्याची घोषणा केली होती. आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरून देखील त्याने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुरस्काराच्या नामकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांसह अनेकांनी टीका केली आहे.

Tags:    

Similar News