केतकी चितळे हिच्यावर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण हे सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी दिली आहे. तसेच रबाळे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भात जामीन अर्जावरही मंगळवारी युक्तिवाद होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
केतकी चितळे यांची कुठलीही तक्रार पोलिसांबाबत नाही. मात्र ज्या पद्धतीने केतकी चितळे हिने पोस्ट केली होती त्याचप्रमाणे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे. मग सर्व सामान्यांना वेगळा न्याय आणि मंत्री महोदय यांना वेगळा न्याय का असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे.