कर्नाटक सरकारची महाराष्ट्रात जाहिरातबाजी
एकीकडे सीमावाद सुरु असताना कर्नाटक सरकारच्या जाहिराती मुंबईतील बेस्ट बसवर झळकल्या आहेत.;
एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) सुरु आहे. दुसरीकडे मुंबईतील (Mumbai Best Bus) बेस्ट बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात दिसल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.
कर्नाटक (Karnataka) सरकारने सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) दिलेल्या सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यातच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष सीमावर्ती भागातील नागरिकांवर लादलेल्या बंधनामुळे आणि कर्नाटकच्या सक्तीमुळे आक्रमक झाला होता. त्यापार्श्वभुमीवर मुंबईतील कुर्ला स्टेशन येथील बस स्टॉपच्या बसवर कर्नाटक नव्याने पाहुया अशी जाहिरात पहायला मिळाली. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीत असलेली ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. (Karnataka Advertise on Best Bus)
कर्नाटक सरकारची जाहिरात मुंबईतील बेस्टवर झळकल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीमध्ये कर्नाटकमधील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या जाहिरातीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavraj Bommoi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे फोटो पहायला मिळत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांची कोंडी करणाऱ्या कर्नाटक सरकारची जाहिरात सीमावासीयांच्या भावनांना ठेच पोहचवणारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.