बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान ने रामायणावर आधारित 'सीता' या पात्राचा रोल करण्यासाठी 12 कोटी रुपये मागितले होते. त्यानंतर करीनाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. करीनाने 12 कोटीचं मानधन मागितलं म्हणून ट्वीटरवर करीनाच्या विरोधात #BoycottKareenaKhan ट्रेन्ड देखील चालवला जात आहे. काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी करीनावर सोशल मीडियाद्वारे टीका केली आहे. करीना कपूर खान आहे. सीतेचा रोल करण्यासाठी हिंदू अभिनेत्री हवी. अशी मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे.
हा वाद नक्की काय आहे? कलाकाराला कोणताही जात, धर्म नसतो. असं बोललं जातं. असं असताना करीना कपूर खान बाबत असं वक्तव्य करणं योग्य आहे का? संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं विश्लेषण