लोकांची आर्थिक स्थिती चांगली झाली, म्हणून महागाई वाढली कालीचरण पुन्हा बरळले
सध्या राज्यात मशिद आणि मंदीरांच्या भोंग्यावरुन वातावरण तापलं आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.त्याबाबत बोलताना कालिचरण महाराज म्हणाला की भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे असे वक्तव्य केले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी जे केले ते भारतभर झाले पाहिजे अशी भावना कालीचरण महाराजाने व्यक्त केली आहे.माध्यमांशी बोलताना कालीचरण महाराजाला हनुमान चालीसा म्हणायला सांगितली असता तो म्हणाला माझी हनुमान चालिसा पाठ नाही,मी तर कालिचा उपासक आहे.
कालीचरण महाराज म्हणाला की भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे गुरुजी यांना क्लिन चिट मिळणे हा हिंदुत्वाचा विजय आहे.गोरक्षाकावर हल्ले होत आहेत. याप्रश्नावर कालीचरण महाराज म्हणाले जर राजा हिंदुत्ववादी नसेल तर हे सगळं होणारच. जो राजा हिंदुंचा विचार करणार नाही त्याचा धर्मरक्षकांसाठी काहीच उपयोग नाही.जे हिंदुंच्या गोष्टी करतील तेच देशात राज करतील हे लक्षात घ्या असे कालीचरण महाराज याने म्हटले आहे.
सध्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली झालेली आहे.आर्थिक स्थिति वाढल्याने महागाई वाढली हे लक्षात घ्या.कोणत्या सरकारच्या काळात महागाई कमी झाली असा प्रतिप्रश्न कालीचरण महाराज याने माध्यमांना केला.आम्हाला विकास पाहिजे परंतु तो पण हिंदुत्ववादी विकास पाहिजे असे त्याने म्हटले आहे.