राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने अमळनेरमध्ये जल्लोष....

Update: 2023-07-02 13:53 GMT

राष्ट्रवादीचे प्रतोद असलेले खानदेशसह जळगाव जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या आजच्या बंडात राष्ट्रवादी प्रतोद असलेले अनिल पाटील त्याने मंत्रीपदाची शपथ घेतली पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.

अमळनेरच्या विविध विकास कामांसाठी मंत्रीपदाचा उपयोग होईल असं व्यक्त अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलं यावेळी ते कार्यकर्त्यांसोबत जल्लोषात सहभागी झाल्या. पतीला मंत्रिपद मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचं त्यांनी सांगितले. पतीला मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी शरद पवार तसेच अजित पवारांचे यांचे आभार मानले...

अनिल पाटील यांचा परिचय

अनिल पाटील हे मूळचे भाजप पक्षातील आहेत,

2014 मध्ये भाजपकडून विधानसभेचे उमेदवार होते

2019 मध्ये भाजपला सोडचिट्टी देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पहिल्यांदा आमदार झाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अनिल पाटील यांचा दबदबा आहे.

बाजार समिती सभापती १० वर्ष,

जिल्हा बँक संचालक १५ वर्ष,

जळगाव दूध संघ संचालक ५ वर्ष,

जि.प.सदस्य १० वर्ष,

आणि आता अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाले आहे.

Tags:    

Similar News