Bageshwar महाराजांना नवीन चॅलेॆज;जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चॅलेंज दिल्यानंतर पळ काढणाऱ्या बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्रीला आता थेट शंकराचार्याने आव्हान दिलं आहे.
उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) इथं जमीन खचण्याच्या घटनेनं सरकारपासून साधू-महंतांपर्यंत सर्वच जण काळजीत पडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीसमोर प्रत्येकजण पूर्णपणे असहाय्य दिसत आहे. त्याचवेळी बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे कथित चमत्कार आजही देशभरात चर्चेचा विषय बनत आहेत. काही लोक त्यांचं समर्थन करत आहेत, तर काही लोक चमत्काराच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. आता ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना आव्हान दिलंय.
उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) इथं जमीन खचण्याच्या घटनेनंदेशभरामध्ये खळबळ उडाली आहे. या नैसर्गिक आपत्ती पुढे सगळ्यांनीच हात टेकले असताना. आता ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना आव्हान दिलंय.
नागपूर मध्ये वीरेंद्र शास्त्री यांचा दरबार सुरू असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी आव्हान दिल्यानं वीरेंद्र शास्त्रीनं पळ काढला होता. शंकराचार्यांच्या आव्हानामुळं बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं बागेश्वर बाबाला आव्हान दिल्यावर आता हिंदू संघटनांनी आंदोलनाची हाक दिलीय. दिल्लीत रोहिणीमध्ये हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करणार आहेत. तर, एकीकडं हिंदू संघटना बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ मैदानात उतरत असताना शंकराचार्यांनी मात्र बागेश्वर बाबाला आव्हान दिलंय.
चमत्कार करत असाल तर धर्मांतरण थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, शांतता प्रस्थापित करा, तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरा तर नमस्कार करू, नाहीतर तुम्ही कपट करत आहात असं मानू असं शंकराचार्यांनी सुनावलंय. यावेळी शंकराचार्यांनीही हात चलाकी करणाऱ्यांवरही निशाणा साधला. एकंदरीतच ह्या चमत्काराच्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्न मागे पडेल असून अवैज्ञानिक वादाला पाठिंबा देऊन भोंदू बाबांची उदातीकरण पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे.