राज्यात मागील 3 ते 4 दिवसापासून सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरण 100 टक्के भरली आहेत. तिकडे बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव येथील स्व भोंडे सरकार जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे हे धरण 100 टक्के भरले.स्व भोंडे सरकार जलाशय 100 टक्के भरल्याने धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जलाशय 100 टाकले भरल्यानंतर आज बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, विद्यमान नगरध्यक्षांचे पती मो सज्जाद , धर्मवीर आखाडाचे अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड, तहसीलदार रूपेश खंडारे ,तसेच शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, आरोग्य सभापती आशिष जाधव,बाळासाहेब धूड,उपनगराध्यक्ष विजय जायभाये, माजी शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल,उमेश कापूरे तसेच सर्व नगर पालिकेचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.