#HijabRow : कर्नाटकमधील शाळा आणि कॉलेज ३ दिवस बंद करण्याची नामुष्की

कर्नाटकमध्ये हिजाब वाद चिघळला आहे. तर हिजाबचा वाद हाताळण्यात कर्नाटक सरकारला अपयश आल्याने कर्नाटकातील शाळा तीन दिवस बंद ठेवण्याची नामुष्की कर्नाटक सरकारवर ओढावली आहे.;

Update: 2022-02-08 13:51 GMT

कर्नाटक राज्यातील एका महाविद्यालयात हिजाब वरून सुरू झालेल्या वादाचे लोण संपुर्ण कर्नाटकात पोहचले असून हा वाद हाताळण्यास कर्नाटक सरकार अपयशी ठरल्याने राज्यातील शाळा-कॉलेज तीन दिवस बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे.

कर्नाटक राज्यातील एका कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्याच्या मुद्द्यावरून धार्मिक तणाव वाढला आहे. मुस्लिम विद्यार्थीनी कॉलेजमध्ये हिजाब घालून येत असल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी भगवा पंचा आणि भगव्या रंगाची शाल पांघरून कॉलेजमध्ये प्रवेश करायला सुरूवात केली. त्यावरून सुरू झालेल्या वादातून मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर त्यानंतर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थीनींच्या हिजाबला बंदी घातल्याने धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यापार्श्वभुमीवर राज्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर या धार्मिक तणावाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे.

कर्नाटक राज्यातील कॉलेजमध्ये सुरू झालेल्या हिजाब वादाने हिंसक वळण घेतले आहे. तर शिवमोगा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांनी कारवाई करत जमावाला पांघवण्यात यश मिळवले. दरम्यान हिजाब घातलेल्या मुलीला भगव्या शाल घेतलेल्या काही मुलांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भगव्या शाली पांघरलेल्या मुलांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी हिजाब परिधाण केलेल्या मुलीने अल्लाहू अकबर च्या घोषणा दिल्या. यावरून कर्नाटकमध्ये हिजाबवरून पेटलेला वाद चिघळला आहे.

कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी कर्नाटक राज्यातील शाळा महाविद्यालये आठ दिवस बंद ठेवावेत, अशी सरकारकडे विनंती केली होती. मात्र अखेर हा वाद हाताळण्यात अपयशी ठरल्याने सरकारने अखेर तीन दिवस शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान कर्नाटक राज्यातील हिजाब वाद उच्च न्यायालयात गेला आहे. त्यावरून सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आपल्याकडे आंतरराष्ट्रीय समुदाय पाहत आहे. त्यामुळे सुरू असलेले कृत्य चांगले नाही. तसेच आपण आपल्या धार्मिक भावना बाजूला ठेऊ आणि संविधानानुसार चालू, असे न्यायालयाने सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाब वादावरून ट्वीट करत राज्यात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. तर पुढील तीन दिवस शाळा कॉलेज बंद असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Tags:    

Similar News