रमाबाई हत्त्याकांडाला २६ वर्ष पूर्ण झाली परंतु आजही रमाबाई नगर न्यायाच्या प्रतिक्षेत
रमाबाई नगर येथी हात्याकांडाला आज २६ वर्ष पूर्ण झाली. ११ जुलै १९९७ रोजी हे हात्याकांड घडल होत. त्याचे पडसाद आजही घाटकोपर येथील रमाबाई नगरमध्ये दिसुन येतात. यामध्ये पोलीस अधिकारी PSI मनोहर कदम यांनी रस्त्यावर उभ राहत दलित झोपडपट्टीच्या दिशेने गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये भीम आर्मीतील ११ जण शहिद झाल्याचं येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आज रमाबाईतील काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.
दरम्यान रमाबाई नगर येथील हात्याकांड हे राजकीय षड्यंत्र घडल होत. ज्यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांना अभय देण्याच काम या राज्यकर्त्यांनी केलं त्यामध्ये अजूनही न्याय्य मिळाला नसल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले
त्या पुढे म्हणाल्या की " देशातील अत्याचाराची मालिकाच संपत नाही. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात सोशित वंचित जाती आणि धर्माचे लोक आहेत यांच्यावर गेल्या दोन महिन्यात सातत्यानं आत्याचार होत असलेल्या बातम्या येत आहेत ही अतिशय गंभीर गोष्ट असल्याच त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.