८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक, विचारवंत, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 'अमृत महोत्सवी' वर्षानिमित्त विवेकनिष्ठ, प्रज्ञावंत डॉ. सबनीस यांच्यावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन सोहळ्यात डॉ.श्रीपाल सबनीस यांचं भाषण लक्षवेधी ठरलं. 'जगात देव आहे का, हे मला सांगता येणार नाही. देव मानणाऱ्यांना आणि देव न मानणाऱ्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्यात न पडता मी स्वतःला मानवतावादी होणं पसंत करतो." असे विचार सबणीस यांनी व्यक्त केले. यांचं गाजलेलं भाषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.!