Nagpur : सरकारचं डोकं जागेवर आहे का. सरकारच्या डोक्यात भुसा भरला आहे का. एक लाख छत्तीस हजारात घर बांधून होतं का. सभापती महोदय तुमची खुर्ची त्यापेक्षा महाग आहे. असे बेधडक मत आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेमध्ये काल व्यक्त केले. पुरवणी प्रश्नसंदर्भात बोलत असताना बारा बलुतेदारांसाठी योजना असावी. यासंदर्भात बोलत असताना शासनाच्या धोरणांमधील त्रुटी दाखवून देत असताना बच्चू कडू बोलत होते.
शहरातल्या लोकांना घरांसाठी अडीच लाख आणि गाववाल्या लोकांना दीड लाख. असा भेदभाव का हा सवाल देखील त्यांनी केला. पाणीसंदर्भात देखील शहरवासियांना पाण्याची जास्त सुविधा जास्त मात्र, ग्रामीण भागातील लोकांना कमी. असा भेदभाव देखील सरकार करत असं का. धनगर समाजाला मेंढी पालन करण्यासाठी शासनाने मदत केली. सरकारने धोरण तपासून काम केलं पाहिजे. स्मारक उभी राहतील समाजही उभा राहिला पाहिजे. अशा पद्धतीने बच्चू कडू यांनी काल विधानसभेमध्ये बेधडक मतं मांडले आहेत.
बारा बलुतेरांसाठी योजना असावी याविषयी बोलत असताना उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देत असे सांगितले की केंद्र शासनाची विश्वकर्मा योजना ही बारा बलुतेदारांसाठीच काम करते.