काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर ; काँग्रेसनेते अशिष देशमुख यांनी केली 'ही' मागणी
काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नागपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसनेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे.;
काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नागपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसनेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे.
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील सरकारी वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मा. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे.
@CMOMaharashtra @OfficeofUT #nagpur #UddhavThackeray pic.twitter.com/lzxKKsVbER
— Dr. Ashish Deshmukh (@AshishRDeshmukh) August 22, 2021
राज्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतांना त्यांनी खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. याबाबत देशमुख यांनी ट्विट करत केदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मंत्री केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता असं देशमुख यांनी म्हटले आहे.या प्रकरणाला जवळपास 20 वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा वेळी सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली. ॲड. कुरेशी हे महाराष्ट्र काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकारावर पडदा पडेल का?, अशी भीती जनसामान्यांमध्ये असल्याचे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सोबतच ॲड. कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम यांच्यासारख्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान देशमुख यांच्या पत्रामुळे काँग्रेसच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता मंत्री सुनिल केदार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.