तो येडझx आहे, चुतिX आहे.. संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर टीका

ED ने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत मालमत्ता जप्त केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली.;

Update: 2022-04-06 05:09 GMT

राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या विरुध्द शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वाक् युध्द पत्रकार परिषदांच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली.

संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, 2013 ते 2015 या काळात किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी सेव्ह विक्रांत चळवळ उभी केली होती. तर या चळवळीच्या माध्यमातून 58 कोटी रुपये लोकांकडून जमा केले होते. तर एकूण 200 कोटी रुपये राजभवनला जमा करण्यात येतील, असे सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र त्याची माहिती अधिकारातून माहिती घेतली असता अशा कोणत्याही प्रकारची रक्कम राजभवनकडे जमा करण्यात आली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सोमय्यांचा देशद्रोह-

किरीट सोमय्या यांनी देशासाठी महत्वाच्या असलेल्या INS विक्रांत सारख्या महत्वाच्या युध्दनौका वाचवण्याच्या कामासाठी पैसा घेऊन तो स्वतःच्या निवडणूकीसाठी आणि मुलाच्या कंपनीसाठी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर हा घोटाळा 100 कोटींपेक्षा मोठा आहे. त्यामुळे या घोटाळ्याची ईडीने चौकशी करावी. तसेच ही माहिती राजभवनच्या पत्रातून समोर आली आहे. त्यामुळे हा सोमय्या यांच्याविरोधातील मोठा पुरावा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोमय्या यांनी देशाशी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तर सोमय्यांनी केलेला हा देशद्रोह असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांचा हा नवा पराक्रम असल्याचे किरीट सोमय्या म्हणत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत यांनी तो येडझX आहे, च्युXया आहे, महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, महाराष्ट्रात अशा च्युXया लोकांना स्थान नाही. ही कीड संजय राऊत संपवणार असे संजय राऊत यांनी सांगितले.

Tags:    

Similar News