Reliance Foundation च्या विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेला सुरूवात
• गुणवत्ताधारित शिष्यवृत्तीद्वारे रु. २ लाखपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे . सक्षम साहाय्य प्रणाली तसेच उत्साही माजी विद्यार्थ्यांच्या संपर्काची संधी मिळते.
• शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी पूर्णवेळ पदवीच्या पहिल्या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांकडून संपूर्ण भारतातून अभ्यासाच्या कोणत्याही शाखेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.
• रिलायन्स फाउंडेशन शिष्यवृत्ती हा उच्च शिक्षणासाठी असलेला भारतातील सर्वात मोठा, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण शिष्यवृत्ती उपक्रमांपैकी एक आहे.
मुंबई : उच्च शिक्षणासाठी भारतातील सर्वात मोठ्या, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण शिष्यवृत्ती उपक्रमांपैकी एक असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीने (Reliance Foundation Scholarship) २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ५००० पदवीपूर्व शिष्यवृत्ती जाहिर करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अभ्यासक्रमाच्या सर्व शाखांमधील पूर्णवेळ पदवीच्या पहिल्या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया खुली आहे.
रिलायन्सचे संस्थापक – अध्यक्ष स्व. धीरूभाई अंबानी यांचा युवकांमधील शक्ती आणि क्षमतांना महत्त्वपूर्ण वाव देण्याबाबत ठाम मत होते. हाच दृष्टीकोन पुढे नेताना, रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट हे युवा वर्गाच्या उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणे असे आहे. डिसेंबर २०२२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांनी, तरुणांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून पुढील १० वर्षांमध्ये ५०००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे सहकार्य करण्याची रिलायन्स फाऊंडेशनची महत्त्वपूर्ण वचनबद्धता जाहीर केली होती.
रिलायन्स फाऊंडेशन पदवीपूर्व शिष्यवृत्तीद्वारे आर्थिक भार न घेता विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहण्यासाठी पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्ता-सह-साधन निकषांवर आधारित विद्यार्थ्यांची निवड होते. या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यास सक्षम बनवत स्वत:ला आणि समुदायाला वृद्धिंगत करत भारताच्या भविष्यातील सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देण्याची क्षमता अनुसरणे हे आहे.
“भारतात जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे आणि तरुणांमध्ये देशाला नवीन क्षितीजावर नेण्याची अतुलनीय क्षमता आहे. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये, आम्ही दर्जेदार शिक्षणाची संधी आणि प्रवेश देण्यासाठी कार्यरत आहोत. तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भारताच्या विकासात योगदान देण्यास सक्षम करण्यास मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असे रिलायन्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Reliance Foundation CEO Jagannatha Kumar) जगन्नाथ कुमार म्हणाले.