जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्के इतका होता. मात्र त्यात घसरण झाल्याचा रिपोर्ट एनएसओने दिला आहे.
जुलै महिन्यात महागाईने लाल झालेल्या जनतेला ऑगस्ट महिन्यात थोडासा दिलासा मिळाला आहे. जी महागाई जुलै महिन्यात 7.44 टक्क्यांवर होती. ती ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांच्या आता आली आहे. त्यातच आता महागाई दर 6.83 इतका आहे. यासंदर्भात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालायने मंगळवारी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार जुलै महिन्यात खाद्य पदार्थावरील महागाई 11.51 टक्के इतकी होती. त्यात घसरण होऊन ऑगस्ट मध्ये 9.94 टक्के इतकी झाली. मात्र देशातील 12 राज्यांमध्ये महागाईचा दर हा देशाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 8.6 टक्के इतका आहे.