Petrol Diesel Price: मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने पार केली शंभरी

Update: 2021-10-09 04:10 GMT

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधन दर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल 26 ते 30 पैसे महागले आहे तर डिझेल 33 ते 37 पैशांनी महागले आहे. मुंबईत डिझेलने तर शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरी पार केली आहे. देशातील इतर राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर , राजस्थान

आणि लडाखमध्ये पेट्रोलने शंभरीपार गेले आहे.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी काल शुक्रवारी जाहीर केलेल्या इंधन दरांनुसार मुंबईत पेट्रोलला प्रतिलीटर दर 109.83 रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी प्रतिलीटर 100.29 रुपये मोजावे लागत आहेत. तिकडे दिल्लीत पेट्रोल 103.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.35 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू असणार आहेत.

दरम्यान या इंधन दरवाढीबाबत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली चिंता केली आहे.आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत ज्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल. सोबतच ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत आम्ही चिंता व्यक्त केली आहे. आता यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही असं दास म्हणाले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल एवढा झाला आहे. मागील सात वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News