राजदीप सरदेसाई दोन आठवडे ऑफ एयर, इंडिया टूडे ची मोठी कारवाई

Update: 2021-01-28 11:50 GMT

ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर चॅनलने मोठी कारवाई केली आहे. राजदीप सरदेसाई यांनी एक चुकीचं ट्वीट केलं म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या चुकीच्या ट्विट मुळे चॅनेल ने त्यांना दोन आठवडे ऑफ एअर म्हणजे दोन आठवडे टीव्हीवर येऊन बातम्या सांगण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर राजदीप यांचा एका महिन्याचा पगार देखील कापला आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीत शेतकरी मोर्चा सुरू असताना राजदीप सरदेसाई यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये दिल्ली आंदोलनात मृत्यू झालेल्या युवकाचा मृत्यू गोळी लागून झाल्याचा दावा केला होता. तसंच या प्रकरणावरून राजदीप यांनी त्यांच्या शोमध्ये केंद्र सरकारला सवाल करत दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न केले होते.

नक्की काय झालं होतं?

दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार या शेतकऱ्यांचा मृत्यू ट्रॅक्टर पलटून जखम झाल्यानं झाला आहे. त्यानंतर राजदीप यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. India Today Takes Anchor Rajdeep Sardesai Off Air, Cuts Month's Salary for Retracted Tweet

ऑक्टोबर 2020 मध्ये इंडिया टुडे ने आपल्या कर्मचाऱ्यांनी काय लिहावं, काय शेअर करावं? आणि काय शेअर करू नये? या संदर्भात एक सोशल मीडिया एडवाइजरी जारी केली आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News