प. बंगालमध्ये पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादिदींची गाणी, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी लता दिदींच्या निधनानंतर मोठी घोषणा केली आहे.;
भाररत्न लता मंगेशकर यांच्या गीतांचे जगभरात चाहते आहेत. तर त्यांनी गायलेल्या गीतांची दखल घेत त्यांच्या कारकिर्दीबाबत केंद्र सरकारने दखल घेऊन लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. तर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये १५ दिवस लता मंगेशकर यांची गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजवून लतादिदींना अनोखी श्रध्दांजली वाहली आहे.
लतादिदींच्या निधनानंतर पश्चिम बंगालमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तर सरकारी कार्यालये, ट्रॅफिक सिग्नल आणि सार्वजनिक ठिकाणी लतादिदींची गाणी वाजवण्यात येतील, तर अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लता मंगेशकर यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली.
केंद्र सरकारने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तर महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. तसेच लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्कवरील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता मंगेशकर यांच्या निधनाची जगभरातून दखल घेण्यात आली. तर जगभरातील नेत्यांनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली. त्यामध्ये न्युयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, पाकिस्तानी माध्यम डॉन यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाची दखल घेतली. तर लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.