मुंबई : गेल्या काही दिवसांपुर्वी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यापाठोपाठ भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते. मात्र काही वेळानंतर त्यांचे अकाऊंट रिस्टोर करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते. तर त्यांच्याकडे बिटकॉईनची मागणी केली होती. मात्र त्यापाठोपाठ केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. तर आता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाची प्रोफाईल बदलण्यात आली होती. त्यानंतर ट्वीटरने माहिती व प्रसारण मंत्रालयाचे ट्वीटर अकाऊंट रिस्टोर केले होते. मात्र त्यापाठोपाठ आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते.
जे पी नड्डा यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक करत ICG ownes India असे नाव बदलण्यात आले होते. तर तसेच Ran by #icg असे ट्वीट करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही वेळाने भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोर करण्यात आले होते.
काही दिवसांपासून देशातील प्रतिष्ठीत ट्वीटर अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर डिसेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक करत त्यांच्याकडे बिटकॉईनची मागणी केली होती. मात्र काही वेळेनंतर त्यांचेही अकाऊंट रिस्टोर करण्यात आले होते. मात्र आताही जे पी नड्डा यांचे ट्वीटर हॅक झाले होते. प्रतिष्ठीत व्यक्तींचे ट्वीटर अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याने सायबर सुरक्षा वाऱ्यावर सुटल्याचे दिसत आहे.