लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भाविकांकडून पैसे घेऊन विठ्ठलाचे व्हीआयपी पदस्पर्श दर्शन घडवून देणाऱ्या एका फुल विक्रेत्या विरूद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुमीत शिंदे असे संशयित आरोपीचे नाव आहे.