भाटगाव हायस्कुल मध्ये दरवळला रामभक्त शबरीमातेच्या बोरांचा सुगंध

बोरांचा वापर करत साकारली श्रीरामाची प्रतिकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरल्याची कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया. शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्री राम चा जय घोष केला आहे.;

Update: 2024-01-18 06:11 GMT

बोरांचा वापर करत साकारली श्रीरामाची प्रतिकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरल्याची कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया. शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्री राम चा जय घोष केला आहे.

कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमाखदार तेवढ्याच पवित्र, धार्मिक वातावरणात पार पडणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे. रामायणातील शबरीमातेची रामभक्ती व उष्टी बोरे ही गोष्ट सर्वसृत आहे. बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कलाशिक्षक देव हिरे यांना सुचली. आयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देव हिरे व विद्यार्थी यांनी ८ बाय ८ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे. या प्रयोगासाठी साठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचे आवाहन मा.मुख्याध्यापक श्री.विजय सानप व पर्यवेक्षक श्री.भीमराव बोढारे यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली. विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कलाशिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरित केलं. तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल १६ तास कला अन् भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली. यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आला. कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा अन् श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता. बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्री रामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचकृषितील विद्यार्थी, पालक यांची गर्दी होत आहे.

Tags:    

Similar News