कोरोना काळात सर्वच स्तरावर लोकांची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थिती कलाकार देखील सुटले नाहीत. कोरोना काळात चित्रपच निर्मिती जवळ जवळ थांबली आहे. नाट्यगृह बंद आहेत. अशा परिस्थिती छोट्या कलाकारांचे तसंच चित्रपटादरम्यान मदत करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
अशा परिस्थिती हे कलाकार आपले प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी अक्षम ठरले आहेत का? पुढारी कलाकारांचा वापर फक्त राजकीय सभा आणि मनोरंजनासाठी करतात का? कलाकारांच्या प्रश्नांबाबत सरकार इतके उदासीन का? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी सुप्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्याशी केलेली विशेष चर्चा