महाराष्ट्राला लोककलावंतांची परंपरा आहे. समाज प्रबोधनाचे वेगवेगळे विषय आपल्या कलेच्या माध्यमातून जनमानसात रुजवण्यासाठी लोककलावंत काम करतात. मात्र, कलाकृती असताना देखील शासनाने अजूनही या कलावंतांना विचारात घेतलेलं नाही. वेगवेगळ्या शहरातील जत्रांमध्ये जाऊन आपली कला सादर करून हे कलावंत आपला उदरनिर्वाह चालवतात. लोककलावंतांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव मांडणारा कलावंतांचा आवाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा....