मी जनतेचा माणूस; मला कुठलीही चिंता नाही: देवेंद्र फडणवीस
पोलिस सुरक्षेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधे घमासान सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राजकीय निर्णय केले जात आहेत व अनेक लोकांना कसलाही धोका नसून त्यांना मोठी सुरक्षा दिली जात आहे, याकूब मेननच्या फाशी नंतर व नक्षलवादी कारवाई नंतर केंद्र सरकार कडून माझ्या जीवास धोका आहे म्हणून माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. मी विना सुरक्षा कुठेही फिरू शकतो यामुळे माझे फिरणे कमी होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी सुरक्षा घेतली त्या पूर्वी मी प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळी मी माझा सुरक्षेसाठी साधा गार्ड देखील ठेवला नव्हता. मुख्यमंत्री झाल्यानंतर याकूब मेननच्या फाशी नंतर व नक्षलवादी कारवाई नंतर केंद्र सरकार कडून माज्या जीवास धोका आहे म्हणून माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण या सरकारला अस वाटत असेल की आता हा धोका कमी झाला आहे म्हणून त्यांनी सुरक्षा कमी केली मला त्यात काही अडचण नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांना पुर्वी झेड प्लस सुरक्षा होती ती आत्ता वाय प्लस करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ताफ्यात असणारी बुलेट प्रूफ कार देखील काढून घेण्यात आली आहे. त्याच सोबत त्यांच्या पत्नी व मुलगीची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
यावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, मी विना सुरक्षा कुठेही फिरू शकतो यामुळे माझे फिरणे कमी होणार नाही. कुणाला सुरक्षा द्याची किंवा नाही द्यायची हे त्याला किती धोका आहे यावर ठरत असत. हे ठरवण्याची एक ठराविक पद्धत आहे. आमच्या काळात आम्ही तीच पद्धत अवलंबत होतो. पण आता मला राजकीय निर्णय केले जात आहेत व अनेक लोकांना कसलाही धोका नसून त्यांना मोठी सुरक्षा दिली जात आहे अस दिसतं. माझी यावर कोणतीही तक्रार नाही. मी जनतेचा माणूस आहे मी जनतेत राहून काम करतो त्यामुळे याचा माझ्या फिरण्यावर परिणाम होणार नसल्याचं देखील फडणवीस म्हणाले.