अशा फुटकळ कवितांची निवड होतेच कशी ? बालभारतीच्या पुस्तकातील या कवितेवर मराठी वाचक संतप्त

Update: 2024-07-22 15:21 GMT

बालभारती मराठीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवर ( पुस्तकात आहे म्हणून कविता) मराठी वाचक चांगलाच संतप्त झाला आहे. मराठी कवितेमध्ये इंग्रजी शब्द वापरणे मराठी वाचकांना रुचलेले नाही.

पूर्वी भावे यांनी लिहिलेल्या या कवितेची बालभारतीच्या पुस्तकात निवडच कशी झाली असा संताप्तक सवाल नेटकरी उपस्थित करत आहे. या कवितेमध्ये वापरण्यात आलेले यमक देखील ओढून ताणून वापरले आहेत. या कवितेच्या दर्जावरच

वाचक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या कवितेतील ही बाब सर्वात प्रथम संदीप जोशी यांनी समोर आणली. मराठी बाल साहित्याला समृद्ध दर्जेदार परंपरा असतानाही अशा फुटकळ कविता पाठ्यक्रमात समाविष्ठ होतातच कशा, पाठ्यपुस्तकात इतरही दर्जाहीन कविता असण्याची शक्यता मराठी वाचक उपस्थित करत आहेत.

काय आहे कविता ?

जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल

अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल

तबल्यावर होती कोल्होबाची साथ

वाघोबा म्हणाले, नाही ना बात?

पेटी मी किती वाजवतो सुंदर

हसत हसत म्हणाले साळींदर

गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस

संतूर वाजवू म्हणाले चिकी मिकी माऊस

मुंगीने लावला वरचा सां

आवाज आवाज ओरडला ससा

ठुमकत नाचत आला मोर

वन्समोअर, वन्समोअर झाला शोर

- पूर्वी भावे

Tags:    

Similar News