लतादीदींचे निधन, जगाने कशी घेतली दखल?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही लता मंगेशकर यांच्या निधनाची दखल घेतली आहे.

Update: 2022-02-06 10:34 GMT

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी 8.12 मिनिटांनी निधन झाले. त्यानंतर देशभरातून दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली. तसेच जागतिक पातळीवरूनही लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रीया जागतिक पातळीवरून व्यक्त केली जात आहे. तर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहताना म्हटले आहे की, गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तर लता मंगेशकर यांनी देशांच्या सीमा ओलांडत संगीत ही एक वैश्विक भाषा आहे, या वाक्याला खरा अर्थ दिला. भारतीय लोकांना आणि लता मंगेशकर यांच्या कुटूंबियासोबत माझ्या संवेदना आहेत. लता मंगेशकर यांच्या संगीतातून कायम जिवंत राहतील, अशा शब्दात महिंदा राजपक्षे यांनी श्रध्दांजली वाहिली.



लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर आता राहिल्या नाहीत. लता मंगेशकर या संगीताच्या साम्राज्ञी होत्या. त्यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. त्यांचा आवाज लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल. भावपुर्ण श्रध्दांजली लता मंगेशकर, अशा शब्दात पाकिस्तानी माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाची दखल घेत त्यांना श्रध्दांजली वाहिली.



लता मंगेशकर यांच्या गाण्याचे फॅन असलेले भारत आणि भुटानमधील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी लता मंगेशकर यांच्या गीतांच्या शब्दात त्यांना श्रध्दांजली वाहिली. तर वॉल्टर जे लिंडनर यांनी ट्वीट करत लिहीले आहे की, मेरी आवाज ही मेरी पहचान है,..गर याद रहे... भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. अशा 7 दशकांच्या संगीत संस्थेची अखेर. मात्र त्यांचा वारसा चिरंतन जीवंत राहिल, अशा शब्दात वॉल्टर जे लिंडनर यांनी शोक व्यक्त केला.



जागतिक माध्यमांनीही घेतली दखल

न्युयॉर्क टाइम्सने लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.


 



लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त जागतिक पातळीवरील नावाजलेल्या द वॉशिंग्टन पोस्टमध्येही निधनाचे वृत्त देण्यात आले आहे.


 



पाकिस्तानी वृत्तपत्र असलेल्या डॉननेही लता मंगेशकर यांच्या निधनाची दखल घेतली आहे.


 



लता मंगेशकर यांनी 7 दशके संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याचीच दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेतल्याचे दिसत आहे.

Tags:    

Similar News