नवीन वर्षात १६० तळीरामांवर कारवाई.

दारु पिऊन वाहने चालवू नका असे आव्हान मुंबई पोलिसांनी केले होेते. कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली.

Update: 2023-01-01 11:25 GMT

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक तरुणाई दारु पिऊन सुसाट वेगाने गाडी चालवत असते. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता दाखवत अनेक ठिकाणी मुंबईचे मार्ग बदलले. अशातचं दारु पिऊन वेगाने वाहन चालवू नये यासाठी मुंबई पोलिसांच्याकडून आव्हानही करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह अनेक वयस्कर मंडळी देखील रेस्टॉरंट. मंदिर, पब, समुद्र किनारे, पाहायाला मिळतं होते. त्यामुळे नवीन वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांची मोठी फौज देखील रस्त्यावर उतरली होती.

तसेच मुंबई शहरात पोलिसांच्याकडून १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.तसेच रस्त्यांवर वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर आणि दारु पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी सूचना मुंबई पोलिसांच्याकडून आधीच देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी १६० तळीरामांवर कारवाई केली तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर ७० लोकांवर कारवाई करण्यात आली.मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षी दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी होती. तसेच तळीरामांमुळे काही ठिकाणी कायद्या सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ब्रेथ अँनलायझेशन द्वारे तपासणी करण्यात आली होती.

Tags:    

Similar News