रशियाच्या लुना-25 च्या अपयशानंतर भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेचं काय होणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर भारताने आपलं यान चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीपणे लँड करत इतिहास रचला.
14 जुलै रोजी भारताचे चंद्रयान-३ अवकाशात झेपावले होते. त्याचं आज सायंकाळी 6.04 मिनिटांनी यशस्वी लँडिंग झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर आनंदोत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या मोहिमेमुळे भारताने चंद्राच्या दक्षिण धृवाकडील भागात यशस्वीपणे लँडिंग केले. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायं. 6.04 वाजता भारताच्या चंद्रयान -३ ने सॉफ्ट लँडिंग केले. या लँडरमध्ये एक रोव्हर आहे. ते रोव्हर लँडरच्या बाहेर येऊन पृथ्वीवर फोटो पाठवणार आहे.
6 जुलै रोजी इस्रोने चंद्रयान ३ हे 14 जुलै रोजी लाँच करण्यात येईल याची घोषणा केली.
त्यानंतर १ जुलै रोजी चंद्रयान ३ ची रंगीत तालीम घेण्यात आली.
14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी चंद्रयान अवकाशात झेपावले.
१४ जुलै: LVM ३ वरून यशस्वी प्रक्षेपण
१४ जुलै - ३१ जुलै: चंद्रयान ३ पृथ्वीच्या कक्षेत
१ ऑगस्ट- ५ ऑगस्ट: चंद्रयान चंद्राच्या दिशेने
५ ऑगस्ट: चंद्रयान चंद्राच्या कक्षेत
६ ऑगस्ट - १६ ऑगस्ट: चंद्रयान ३ ने चंद्राचे आणि पृथ्वीचे फोटो पाठवले
१७ ऑगस्ट: विक्रम लँडर मोड्युल प्रॉपल्शन मोड्युलपासून वेगळं
१८ ऑगस्ट - २० ऑगस्ट: चंद्रयान ३ चंद्रापासून २५ किमी अंतरावर
२३ ऑगस्ट: चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आणि भारताने इतिहास रचला.