युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात भारतीय तरूणाचा मृत्यू, हिंदू सेनेचा रशियाला पाठिंबा

रशियाने केलेल्या हल्ल्यात भारताचा युवक ठार झाला आहे. तर दुसरीकडे हिंदू सेनेने रशियाला पाठींबा दिला आहे.;

Update: 2022-03-01 13:51 GMT

रशिया युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. तर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह, युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये केलेल्या मिसाईल हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे हिंदू सेनेने पोस्टरबाजी करत रशियाला पाठींबा जाहीर केला आहे.

रशिया युक्रेन युध्द सुरू आहे. तर रशियाने युक्रेनमधील खारकोव्ह शहरात केलेल्या मिसाईल हल्ल्यात भारतीय युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे हिंदू सेनेने दिल्लीतील मंडी हाऊस परिसरात रशियन कवी अलेक्झेंडर पुश्किन यांच्या पुतळ्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे पोस्टर लावत रशियाचे समर्थन केले आहे.

हिंदू सेनेने लावलेल्या पोस्टरच्या माध्यमातून पुतीनने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. या पोस्टरवर भारतातील हिंदू लोक पुतीन यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या पोस्टवर रशिया सोव्हियत यूनियन स्थापन करत आहे. जय हो अखंड रशिया, जय भारत। अशी घोषणा लिहीली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरसंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

पाहूयात नक्की काय आहे प्रकरण :

 Full View

Tags:    

Similar News