मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना हायकोर्टाचे आदेश

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. त्यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झाले असून, मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. गुणरत्न सदवार्तेच्या या मागणीवर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे;

Update: 2024-01-24 12:07 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. त्यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झाले असून, मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. गुणरत्न सदवार्तेच्या या मागणीवर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आह

मनोज जरांगेंना हायकोर्टाचे आदेश

"सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी" असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील कळवण्यात यावे,असे आदेश कोर्टाने दिले.


मनोज जरांगेंचं सदावर्तेंना प्रत्युत्तर

हायकार्टाच्या आदेशावर मनोज जरांगे म्हणाले की " माननिय न्यायालयानं काय निर्णय दिला हे वाचून माहिती घेऊन कळवतो, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. दरम्यानं सदावर्तेंना आम्ही किंमत देत नाही असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यांना घाबरण्याची गरज नाही न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया

दरम्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की " मराठा आरक्षणात त्रुटी दुर करण्याच काम मागासवर्ग आयोग करत आहे. आरक्षणासाठी सरकार सकारत्मक आहे. आम्ही सर्व सुविधा देतो आहोत अशी प्रतिक्रीया शिंदे यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News