#HeavyRainfall : मुंबईत कोसळधार सुरूच, आणखी 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Update: 2021-07-19 01:27 GMT

मुंबईत शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतलेली नाही. रविवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असून रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे 4 दिवस मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार मुंबईत सुरू झालेल्या पावसाने अजिबात विश्रांती घेतलेली नाही. मुंबईतल्या अऩेक सखल भागात पाणी भरलेले आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडल्यावर सतर्कता बाळगावी तसेच झाडांच्या खाली किंवा जवळ उभे राहू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील पुढच्या काही दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे, तसेच काही सूचना केल्या असल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

"हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता @mybmc तसेच इतर सर्व यंत्रणांनी अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगून समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी आज दिले. पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका कायम आहे. त्यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरू करण्याच्या सूचना मी केल्या आहेत."

मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. काही भागात 3 तासांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहितीही आदित्या ठाकरे यांनी दिली आहे. "काल रात्री पासून मुंबईत वादळी वारा व मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील काही भागात फक्त ३ तासात २०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. अल्पावधीत झालेल्या या छोट्या ढगफुटीच्या घटना होत्या."

Tags:    

Similar News